
About the Book: अविट गोडी मधुरसाची, फुलाफुलांतून दरवळणारा सुगधं, आपल्या पूर्णऔदर्याने निथळणाऱ्या चंद्राचे सौंदर्य, रानपाखरांच्या रुपेरी कंठातून निनादणारे सुरमयी गाणे, घनधार वर्षावात फुलणारा मृदगंध, खळखळून हसणारे अबोध कोवळे ऊन कधी कुणाला समजावून सांगावे लागेल का ? उमेश चव्हाण यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या कविता आशाच आहेत. या संग्रहातील कविता मानवी संवेदनेला एका विराट उंचीवर घेऊन जातात. पाण्यात विरघळणाऱ्या हिमनगाप्रमाणे अवर्णनीय आनंदाच्या तरल रेशमी अनुभूतीत आपण केव्हा हरवून जातो याचे भान आपल्यालाही राहत नाही. About the Author: अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेले उमेश नारायण चव्हाण हे एक विद्यार्थी प्रिय उत्तम शिक्षक, तत्वचिंतक, प्राकृतिक चिकित्सक, चित्रकार, बाँसुरी वादक, ओजस्वी वक्ता, योगशिक्षक आणि प्रखर विचारक आहेत. महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील रेणापूर हे त्यांचे जन्मस्थान. मायानगरी मुंबई जवळील निसर्ग सौंदर्याने नटलेले कर्जत शहर ही त्यांची कर्मभूमी. पर्यावरण संवर्धन तसेच समाजातील दुर्बल घटक यांकरिता ते करत असलेले कार्य प्रेरणादायी आहे. एक उत्कृष्ट मुखपृष्ठकार म्हणून त्यांनी आपली छाप उमटवली आहे. त्यांच्या कुंचल्यातून साकारलेली आशयघन चित्रे प्रथितयश लेखकांच्या पुस्तकांच्या सौंदर्याला द्विगुणीत करत आहेत. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांत त्यांची साहित्य साधना अखंड सुरु आहे. त्यांच्या अभिजात विविधांगी कवितांनी रसिक मनाला भुरळ घातलेली आहे. देशभरातील नामांकित पत्र-पत्रिकांमध्ये त्यांचे साहित्य प्रकाशित झालेले आहे. कला, साहित्य, पर्यावरण आणि सामाजिक कार्य यांतील योगदानाकरिता त्यांना अनेक सम्मान व पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
| Brand Name | SVAYANYUG PUBLICATION |
| Manufacturer | Svayanyug Publication LLP |
| Item Type | Shintoism · Books |
| Shipping Weight | 200 g |
| Package Dimensions | 13.3 × 2.5 × 19.7 cm |
| Category | Books › Religion & Spirituality › Shintoism |
| Category Rank | #414,852 in Books |
| Marketplace Rating | 5.0 out of 5 (8 ratings on the source marketplace) |
| EAN | 9789348420770 |