
पुस्तकाविषयी - थक्क करून सोडणाऱ्या गुन्हेगारी विश्वाच्या थरारक सत्य कथा, गुन्हा कसा घडला याचं रंजक कथन आणि गुन्हेगार का घडला याचं मानसशास्त्रीय विश्लेषण अच्युत गोडबोले यांच्या ओघवत्या शैलीत. “क्रिमिनल सायकॉलिजी”हे पुस्तक वाचण्या सारखं आहे. सुशांत सिंह राजपूत, जोशी अभ्यंकर प्रकरण, निठारी प्रकरण, नीरज ग्रोवर खून प्रकरण, रामन राघव, ऑटो शंकर, जगातला सगळ्यात लहान सीरियल किलर, जगातली सर्वात लहान खूनी महिला, भारतातल्या पहिल्या महिला ज्यांना फाशी ची शिक्षा दिली गेली, अशी अनेक प्रकरणं या पुस्तकात वाचायला मिळतात. गुन्ह्यामागचं गुन्हेगारी मानसशास्त्र समजायला प्रत्येक गुन्हेगाराच्या भूतकाळाची ओळख आणि ए आय मुळे गुन्ह्याच्या तपासात होऊ घातलेले भविष्यातले बदल या दोन्ही बद्दल अभ्यासपूर्ण माहिती अच्युत गोडबोले आणि परेश चिटणीस यांनी दिली आहे. लेखकांविषयी - अच्युत गोडबोले - विज्ञान, मानसशास्त्र, तंत्रज्ञान, व्यवस्थापन, संगीत, साहित्य आणि अर्थशास्त्र अशा विविध क्षेत्रांमध्ये ७५ हून अधिक पुस्तके लिहिणारे मराठीतील अत्यंत लोकप्रिय लेखक. गुंतागुंतीचे विषय सहज आणि ओघवत्या भाषेत मांडण्याची त्यांची खास शैली त्यांना सर्व वयोगटातील वाचकांमध्ये प्रिय बनवते. परेश चिटणीस - फॉरेन्सिक सायन्स व क्रिमिनल सायकॉलॉजीचे तज्ज्ञ, सरकारी मान्यताप्राप्त फॉरेन्सिक डॉक्युमेंट एक्झामिनर आणि प्रसिद्ध ग्राफॉलॉजिस्ट. पोलिस विभागांसोबतचे काम, प्रत्यक्ष केस-वर्कचा अनुभव आणि गुन्हेगारांच्या मनोवृत्तीचं सखोल ज्ञान त्यांच्या लेखनाला वास्तव आणि विश्वासार्हतेची धार देते. संयुक्त लेखन - अच्युत गोडबोले आणि परेश चिटणीस यांनी याआधी लिहिलेलं ‘गुन्ह्याच्या पाऊलखुणा’ हे पुस्तक वाचकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळवून अत्यंत लोकप्रिय ठरलं. गुन्हे आणि गुन्हेगारांच्या मनोवृत्तीचा ओघवता, समजण्यास सोपा आणि खोलवर जाणारा अभ्यास वाचकांना खूप भावला.
| Brand Name | Rudra Publishing House |
| Manufacturer | Rudra Publishing House |
| Item Type | Crime · Books |
| Shipping Weight | 280 g |
| Package Dimensions | 21 × 14 × 1 cm |
| Category | Books › Crime, Thriller & Mystery › Crime |
| Category Rank | #9,558 in Books |
| Marketplace Rating | 4.2 out of 5 (13 ratings on the source marketplace) |
| EAN | 9788199447127 |



