
पूर्व पाकिस्तानच्या (आताचा बांगलादेश) सीमेजवळील भारतीय प्रदेशांतील सामान्य लोकांशी, कार्यकर्त्यांशी, बुद्धिवंतांशी संवाद साधून केलेली ही लेखमाला १९६८ मध्ये आचार्य अत्रे संपादक होते त्या 'मराठा' दैनिकात क्रमशः प्रसिद्ध झाली. ती संपूर्ण लेखमाला हमीद दलवाईंच्या मृत्यूनंतर १९८२ मध्ये श्रीविद्या प्रकाशनाकडून पुस्तकरूपाने आली. त्यानंतर ३५ वर्षांनी आलेली ही दुसरी आवृत्ती. या लेखमालेला भारतीय फाळणीच्या भळभळणाऱ्या जखमांची व १९६५ च्या भारत-पाक युद्धाची पार्श्वभूमी होती, आणि -९७१ चे भारत-पाक युद्ध व पाकिस्तानच्या विभाजनापूर्वीच्या खदखदणाऱ्या परिस्थितीचे संदर्भही होते. जवळपास ५० वर्षांपूर्वीचे हे लेखन आता का वाचायचे? हिंदू-मुस्लिम प्रश्न आणि राष्ट्रीय एकात्मता यांच्या संदर्भातील /गुंतागुंत काहीअंशी समजून घेण्यासाठी आणि तो गुंता किती कमी झाला आहे व आणखी कमी कसा होईल, याबाबतच्या अंदाजांना चालना देण्यासाठी !
| Brand Name | Sadhana Prakashan |
| Manufacturer | Sadhana Prakashan |
| Item Type | Diaries & Journals · Books |
| Shipping Weight | 120 g |
| Package Dimensions | 35.6 × 30.5 × 2.5 cm |
| Category | Books › Biographies, Diaries & True Accounts › Diaries & Journals |
| Category Rank | #430,307 in Books |
| Marketplace Rating | 4.7 out of 5 (8 ratings on the source marketplace) |
| EAN | 9789386273024 |
| Attributes | Language Published: Marathi · Binding: Paper Back |



