
सुखी माणसाच्या सदऱ्याविषयी तुम्ही ऐकलं असेल. सुखी स्त्रीच्या साडीविषयी काही ऐकलं आहेत? डाऊन्स सिण्ड्रोम हा शब्द तुमच्या कानावरून गेला असेल; पण 'सावत्र आई सिण्ड्रोम' असू शकतो असं तुम्ही कधी मानलंय? भाषा वापरण्यात, ऐकण्यात तुमचा जन्म गेलाय; पण आज आपण फारच अनुवादित भाषा वापरतोय हे तुम्हाला जाणवलंय? रोजच्या जगण्याविषयी, रोज वापरतो त्या भाषेविषयी, रोज कानांवर पडणाऱ्या गाण्यांविषयी, नेहमीच्या वाचनातल्या पुस्तकांविषयी, हसत खेळत छोटी-मोठी भाष्यं करणारा हा ललित लेखसंग्रह तुम्ही वाचायलाच हवा. सुखी स्त्रीची साडी मिरवायला कोणाही बाईला आवडेल यात शंकाच नाही; पण सुखी स्त्रीच्या साडीचा लहरता पदर निरखायला पुरुषांना आवडणार नाही असं थोडंच आहे? वाचून तर बघा!
| Brand Name | Saket Prakashan |
| Manufacturer | Saket Prakashan Pvt Ltd |
| Item Type | Indian Writing · Books |
| Shipping Weight | 140 g |
| Package Dimensions | 20.9 × 13.7 × 0.9 cm |
| Category | Books › Literature & Fiction › Indian Writing |
| Category Rank | #88,117 in Books |
| Marketplace Rating | 4.5 out of 5 (32 ratings on the source marketplace) |
| EAN | 9788177868968 |